Indore Shocker: पार्टनरच्या सांगण्यावरून तरुणाने केले Sex Change Operation; नंतर प्रियकराचा लग्न करण्यास नकार, गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव वैभव शुक्ला असून तो उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित 2021 मध्ये सोशल मीडियावर आरोपीला भेटला होता.
Indore Shocker: सोशल मीडिया साईट्सवर दोन तरुणांमधील मैत्री आणि प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इंदूरच्या विजयनगरमध्ये इंस्टाग्रामवर एका मुलाची दुसऱ्या मुलाशी मैत्री झाली. दोघांचे बोलणे सुरु झाले व कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनतर या 28 वर्षीय तरुणाने जोडीदाराच्या सांगण्यावरून त्याचे लिंग बदलून घेतले, पण नंतर त्याच्या प्रियकराने त्याची फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव वैभव शुक्ला असून तो उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. पीडित 2021 मध्ये सोशल मीडियावर आरोपीला भेटला होता. वैभव शुक्लाने त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पिडीत तरुणाने आपले लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर आरोपीने आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. पिडीत तरुणाने (शस्त्रक्रियेनंतरची तरुणी) सांगितले की, वैभव शुक्लाच्या विनंतीनुसार, तसेच वैभवने लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने आपले लिंग बदलले. मात्र नंतर वैभव शुक्लाने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडितेने विजय नगर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Rape Accused Flees Police Station in Mumbai: बलात्कार आरोपी बाथरूम ला जाण्याच्या बहाण्याने पोलिस स्टेशन मधून पळाला; पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या)
Indore Man Gets Sex Change Operation On Partners Request, Then Gets Rejectedhttps://t.co/9lvt0Ev360 pic.twitter.com/13jCACv99L
— NDTV (@ndtv) February 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2024 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

