पती-पत्नीमधील घटस्फोटासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पत्नीची दारू पिण्याची सवय, जोपर्यंत ती दारूच्या नशेत पतीसोबत असभ्य किंवा अनुचित वर्तन करत नाही, तोपर्यंत पतीविरुद्ध क्रौर्य ठरत नाही. न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने पत्नीपासून घटस्फोट मागणाऱ्या पुरुषाच्या अपीलवर निर्णय देताना ही टिप्पणी केली. याचिकाकर्त्या पतीने आपल्या अर्जात पत्नीवर क्रूरतेचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. पतीने दिलेल्या युक्तिवादांपैकी एक असा होता की, पत्नी त्याला न सांगता तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जात होती आणि दारू पीत होती.

न्यायालयाने म्हटले आहे की, जोपर्यंत अयोग्य आणि असभ्य वर्तन होत नाही, तोपर्यंत दारू पिणे ही क्रूरता मानली जात नाही. पत्नीने मद्यपान केल्याने पती/अपीलकर्त्याशी क्रूरपणा झाला याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे क्रूरतेच्या आधारावर नाही तर, दोघेही अनेक काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. एका वैवाहिक वेबसाइटद्वारे भेटल्यानंतर या जोडप्याने 2015 मध्ये लग्न केले. मात्र ते दोघे 2016 पासून विभक्त राहत आहेत. याआधी पतीने लखनऊच्या कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली, जिथे त्याची घटस्फोटाची याचिका फेटाळण्यात आली. याविरोधात पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. (हेही वाचा: Married Woman and Sex: लैंगिक संबंधाचा अनुभव असलेल्या विवाहित महिलेने प्रतिकार केला नाही तर, ते संबंध तिच्या इच्छेविरुद्ध मानले जाणार नाहीत; Allahabad HC चे निरीक्षण)

Wife Drinking Alcohol and Divorce Case:

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)