SC on Pregnancy: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 20 वर्षीय अविवाहित 30 आठवडे गरोदर तरूणीची गर्भपात परवानगीची याचिका; 'गर्भातील बाळाच्या अधिकाराचं काय?' विचारला सवाल

Live Law च्या वृत्तानुसार, याचिकाकर्ती 20 वर्षांची अविवाहित विद्यार्थी NEET परीक्षेची तयारी करत आहे. तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, तिला 16 एप्रिल रोजी पोटात जडपणा आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर गर्भधारणेबद्दल कळले.

SC on Pregnancy: सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळली 20 वर्षीय अविवाहित 30 आठवडे गरोदर तरूणीची गर्भपात परवानगीची याचिका; 'गर्भातील बाळाच्या अधिकाराचं काय?' विचारला सवाल
Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाने आज (15 मे) 20 आठवड्यांच्या पार गेलेल्या गर्भधारणेमध्ये गर्भपात करण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारली आहे. न्यायमूर्ती BR Gavai, Sandeep Mehta आणि VN Bhatti यांनी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर विचार करत होते. 3 मे रोजीच्या आपल्या आदेशात उच्च न्यायालयाने गर्भधारणा संपवण्याची मागणी करणारी महिलेची याचिका फेटाळून लावली. तेव्हा, महिलेच्या गर्भधारणेने 29 आठवडे ओलांडले होते. Live Law च्या वृत्तानुसार, याचिकाकर्ती 20 वर्षांची अविवाहित विद्यार्थी NEET परीक्षेची तयारी करत आहे. तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, तिला 16 एप्रिल रोजी पोटात जडपणा आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर गर्भधारणेबद्दल कळले. तोपर्यंत, गर्भधारणेला 27 आठवडे पूर्ण झाले होते. याचिकाकर्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य गंभीर धोक्यात असल्याचे वकिलांनी खंडपीठाला सांगितले तेव्हा न्यायमूर्ती मेहत यांनी, "7 महिन्यांची गर्भवती! गर्भात असलेल्या बाळाच्या आयुष्याचे काय? गर्भात असलेल्या बाळालाही जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. असे सुनावले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).