पेटीएम आणि त्याच्या वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पेटीएमला टीपीएपी म्हणजेच थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरचा परवाना मिळाला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) One97 Communications Limited (OCL) ला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत, थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून युपीआय मध्ये सहभागी होण्यासाठी मंजुरी दिली. यासोबतच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम आणि येस बँक यांच्यातील ग्राहक पेमेंटसाठीच्या करारालाही मान्यता दिली आहे. म्हणजेच येस बँक पेटीएम वापरकर्त्यांसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रदाता म्हणून काम करेल. यासह ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियादेखील पेटीएमसाठी पेमेंट सिस्टम प्रदाता (पीएसपी) बँका म्हणून काम करतील. ही बाब विद्यमान वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांना अखंडपणे युपीआय व्यवहार करणे सुरू ठेवण्यास सक्षम करेल. एनपीसीआयचा हा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी आला आहे, ज्यामध्ये पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे ग्राहक आणि व्यावसायिकांना 15 मार्चपर्यंत त्यांची खाती इतर बँकांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: US Set to Ban TikTok? भारतानंतर आता अमेरिकेचाही चीनला दणका; टिकटॉकवर बंदी घालणारे विधेयक सभागृहात मंजूर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)