मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कालपासून पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. विविध भागांची पाहणी तसेच मदतीची घोषणा शिंदे सरकारकडून पुरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. तसेच संबंधीत योजनेतील ज्या काही जाचक अटी असतील त्या दूर करत त्वरीत शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले आहेत.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या #पूर व #अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर #अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. याबाबतच्या योजनेतील जाचक अटी दूर करून #शासननिर्णय त्वरित काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. pic.twitter.com/wd2pSFiKKR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)