जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यानंतर हिमालयातील गुहेच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. धार्मिक मंत्रपठणाच्या गजरात, 4,603 यात्रेकरूंची तुकडी भगवती नगर यात्री निवास येथून दोन एस्कॉर्टेड ताफ्यांमधून रवाना करण्यात आली आहे. 4,603 यात्रेकरूंपैकी 1,933 उत्तर काश्मीर बालटाल मार्गाने आणि 2,670 दक्षिण काश्मीर नुमवान (पहलगाम) बेस कॅम्पला जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)