भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पण पाकिस्तानचा इतिहास पाहता त्यांनी अशा शस्त्रसंधी दरम्यान दगाफटका केला आहे त्यामुळे आता ही वेळ सजग राहण्याची आहे. या काळात सैनिकांच्या शौर्यगाथा, बलिदान यांची माहिती देण्याऐवजी 'विजय यात्रा' काढणं मनाला त्रास देणारे आहे असे अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे. आपण भावनांची योग्य  दखल घ्याल असंही त्यांनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांचं पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)