IndiGo's New Feature For Female Passengers: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने महिलांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे, महिलांना वेब चेक-इनच्या वेळी इतर महिला प्रवाशांनी आधीच बुक केलेल्या सीटची माहिती मिळू शकते. म्हणजेच महिलांना हवे असल्यास त्या अशा सीट्स निवडू शकतात, जिथे शेजारी एखादी महिला प्रवासी असेल. मार्केट रिसर्च केल्यानंतर एअरलाइनने हे फीचर सुरू केले आहे. इंडिगोने याबाबत आज एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. प्रसिद्धीपत्रकात, एअरलाइनने म्हटले आहे की, या सुविधेचा उद्देश महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक बनवण्याचा आहे. या फीचरद्वारे महिला प्रवासी त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्या महिला प्रवाशांच्या शेजारील सीट निवडू शकतात. एकट्या किंवा कुटुंबासह प्रवास करणाऱ्या महिलांनाही या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. हे फिचर केवळ वेब चेक-इन दरम्यानच महिला प्रवाशांनी बुक केलेल्या जागा दर्शवते. इंडिगोचे हे फिचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे. सामान्यतः, देशांतर्गत उड्डाणांसाठी, ऑनलाइन चेक-इन प्रस्थान वेळेच्या 48 तास आधी केले जाऊ शकते व ते टेकऑफच्या 2 तास आधी बंद होते. (हेही वाचा: Kedarnath Heli Service: हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला जायचे आहे? जाणून घ्या IRCTC द्वारे बुकिंग कसे करावे, पहा संपूर्ण तपशील)
पहा पोस्ट-
IndiGo announces the introduction of a new feature for the female passengers. The feature offers visibility of seats booked by female passengers, only during web check-in. It is specifically tailored to PNRs with women travellers - solo as well as part of family bookings. This… pic.twitter.com/gXIsPw7zH3
— ANI (@ANI) May 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)