जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे बॉम्बच्या धमकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  संबंधित अधिकारी आणि बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या विमानाची तपासणी करत आहे. 225 प्रवाशांना घेऊन जाणारे  विमान रात्री 8.50 वाजता मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, त्यानंतर प्रवाशांना ताबडतोब विमानातून बाहेर काढण्यात आलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)