
Kedarnath Heli Service: उत्तराखंड चार धाम यात्रा (Char Dham Yatra 2024) 10 मे पासून सुरू झाली आहे. राज्यातील केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धामची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. मोठ्या संख्येने लोक चारधामला पोहोचत आहेत. केदारनाथ धामला भेट देण्यासाठी हेलिकॉप्टर सेवादेखील चालविली जात आहे. केदारनाथचा खडतर प्रवास अनेक भक्तांसाठी कठीण आहे. अशा परिस्थितीत लोक हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रवास करू शकतात. तुम्हीही केदारनाथ धामला जात असाल आणि हेलिकॉप्टर सेवा बुक करू इच्छित असाल, तर आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून हेलिकॉप्टर सेवेचे बुकिंग करू शकाल.
केदारनाथ व्यतिरिक्त, तुम्ही हेमकुंड साहिबसाठीदेखील आयआरसीटीसीद्वारे हेलिकॉप्टर बुक करू शकता. लक्षात ठेवा हेलिकॉप्टर बुकिंग नेहमी फक्त आयआरसीटीसी वेबसाईटद्वारेच केले पाहिजे. इतर कोणत्याही बनावट APP किंवा वेबसाइटवरून हेलिकॉप्टर बुकिंग करू नका. अशा परिस्थितीत तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केदारनाथला येणारे सर्व प्रवासी या लिंकद्वारे हेली बुकिंग करू शकतात.
हेली बुकिंग कशी करावी?
हेली सेवा बुकिंगसाठी सर्वात प्रथम आयआरसीटीसी खाते तयार करा.
त्यानंतर https://heliyatra.irctc.co.in/ वर लॉग इन करा.
तिथे तुमचा नोंदणी क्रमांक किंवा ग्रुप आयडी टाकून जागांची उपलब्धता तपासा. एखाद्या व्यक्तीसाठी एक युनिक नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. जर तुम्हाला अनेक लोकांसाठी एकत्र बुक करायचे असेल, तर ग्रुप आयडी टाका.
पुढे तुम्हाला हवी असलेली तारीख आणि वेळ स्लॉट निवडा.
त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करून तुमच्या बुकिंगची पुष्टी करा.
यानंतर तुम्ही तुमचे तिकीट डाउनलोड करू शकता.
चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक-
हेलिकॉप्टर सेवा ऑनलाइन बुक करण्यासाठी, उत्तराखंड सरकारच्या पोर्टलवर चारधाम यात्रेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर आधी नोंदणी केली नसेल तर चार धाम यात्रेसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in वर जाऊन नोंदणी करा. (हेही वाचा: कर्नाटक सरकार भरणार PM Modi यांनी वास्तव्य केलेल्या म्हैसूरच्या हॉटेलचे 80 लाखांचे बिल; मंत्री Eshwar Khandre यांची माहिती)
तिकिटाची किंमत-
केदारनाथसाठी हेलिकॉप्टर तिकिटाची किंमत बुकिंग तारखेनुसार बदलते. याशिवाय, केदारनाथसाठी तुम्हाला कोणत्या स्टॉपवरून हेलिकॉप्टर हवे आहे, त्यानुसार वेगवेगळ्या किंमती आहेत. यासाठी तुम्हाला प्रति तिकिट 5 हजार ते 10 हजार रुपये मोजावे लागतील.