गाजियाबाद मध्ये दिल्ली-मीरठ एक्सप्रेस वे वर एक भीषण अपघात झाला आहे. यात वेगात समोरासमोर आलेल्या दोन वाहनांचा एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. चूकीच्या दिशेने आलेल्या बसच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे. शाळेच्या बस मध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते. परंतू गाडीत एकाच कुटुंबातील सदस्य होते. मृतांमध्ये 2 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. तर 2 गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. दिल्लीहून सीएनजी भरून बस चालक चुकीच्या दिशेने येत होता. कारमधील लोक मेरठहून येत होते आणि त्यांना गुडगावला जायचे होते. Ghaziabad-Aligarh Expressway: अवघ्या 100 तासांत बांधला 100 किलोमीटरचा गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वे; झाला विश्वविक्रम, Nitin Gadkari यांनी केले कामाचे कौतुक (See Photos) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)