Ghaziabad Road Accident: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद (Ghaziabad) येथे वैशाली भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागू दुसऱ्या कारने धडक (Road Accident) दिली. यात एकाचा मृत्यू (Dead) झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना एबीएस कॉलेजजवळ घडली. अपघाताच्या वेळी, पार्क केलेल्या कारचा चालक स्टेपनी बदलत होता. ही टक्कर इतकी भीषण होती की तो कारच्या खाली दबला गेला आणि दोन्ही कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी (Video)

एका व्यक्तीचा मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)