Ghaziabad Fire: शनिवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील कानवानी गावातील (Kanawani Village) झोपडपट्टीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. व्हिडिओमध्ये झोपडपट्टीतील अनेक घरे जळून राख झाल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार, आगीमुळे अनेक गॅस सिलिंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग सुरुवातीला एका झोपडपट्टीत लागली पण वेगाने इतर घरांपर्यंत पसरली. त्यामुळे रहिवाशांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून खबरदारी म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. आगीपासून वाचण्यासाठी झोपडपट्टीतील अनेक रहिवासी आपले सामान घेऊन धावताना दिसले.
गाझियाबादमध्ये कानवानी गावाजवळील झोपडपट्ट्यांमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ -
VIDEO | Fire breaks out in slums near Kanawani village in Ghaziabad, UP. Further details awaited.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/kHUmuYE6TC
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)