Fly 91 Gets DGCA's License: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने नवीन एअरलाइन फ्लाय 91 ला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) दिले आहे. फ्लाय-91 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर करत लिहिले की, 'अखेर प्रतीक्षा संपली. FLY91 टीमच्या 4 वर्षांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे. डीजीसीए इंडियाकडून एअर ऑपरेटिंग प्रमाणपत्र मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि या प्रवासात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही माननीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, MoCA_GoI आणि DGCA यांचे आभार मानतो.'

अशाप्रकारे फ्लाय-91 च्या रूपाने देशातील विमान वाहतूक क्षेत्रात लवकरच नवीन विमान कंपनी दाखल होणार आहे. फ्लाय-91 ही किंगफिशर एअरलाइन्सचे माजी सीईओ मनोज चाको यांनी सुरू केलेली नवीन एअरलाइन आहे. या विमान कंपनीला मागच्या वर्षी एप्रिलमध्येच सरकारकडून उड्डाणाची परवानगी मिळाली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त केल्यानंतर, फ्लाय-91 एअर ऑपरेटर परमिट (AOP) मिळविण्याचा प्रयत्न करत होती, जे त्यांना आता मिळाले आहे. अहवालानुसार न्यू गोवा विमानतळ हे कंपनीचे बेस सेंटर असेल आणि गोवा हे कंपनीचे मुख्यालय असेल. (हेही वाचा: Vande Bharat Express: प्रवाशांना दिलासा! लवकरच सुरु होणार मुंबई-कोल्हापूर आणि पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)