परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. भारताच्या कोणत्याही देशाशी असलेल्या संबंधांबाबत ते निर्भयपणे आपले मत मांडतात. पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत-रशिया, भारत-चीन, भारत-अमेरिका, भारत-कॅनडा आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आपले मत मांडले आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद सोडत नाही तोपर्यंत संबंध सामान्य होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. चीनबाबत बोलताना ते म्हणाले की, आता हे संबंध असामान्य आहेत.
खलिस्तान कारवायांबाबत भारताने कॅनडाच्या सरकारला वारंवार माहिती दिली होती, पण तरीही दहशतवाद आणि खलिस्तान चळवळीविरुद्ध कॅनडा सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. आता कॅनडावर भाष्य करताना ईएएम एस जयशंकर म्हणाले, ‘त्यांच्यासाठी व्होट-बँकेचे राजकारण महत्वाचे आहे. त्यांच्या प्रतिसादांवरही व्होट बँकेचे नियंत्रण असल्याचे जाणवते व त्यामुळे ते फार मर्यादित आहेत. आम्ही हे अगदी स्पष्ट केले आहे की, कॅनडामधून आमची राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोहोचणाऱ्या कारवायांसाठी परवानगी मिळत असेल तर, आम्हाला प्रतिसाद द्यावा लागेल. गेल्या काही वर्षांत याचा आमच्या संबंधांवर अनेक प्रकारे परिणाम झाल्याचे तुम्ही पाहू शकता.’ (हेही वाचा: एशिया पॅसिफिक राष्ट्रात भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, पुढील तीन वर्षांमध्ये राहील 6% वाढ)
#WATCH | Delhi: Dr EAM S Jaishankar on Canada: "They seem driven by vote-bank politics. Their responses have been constrained by what they regard as vote bank compulsions. If there are activities in Canada that impinge on our national security & integrity, then we will have to… pic.twitter.com/wc1l1CjODZ
— ANI (@ANI) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)