भारत एशियन पॅसिफिक (Asia Pacific Nations) देशांमधील पुढच्या काही वर्षांमध्ये सर्वात वेगाने आर्थिक वृद्धी करणारा देश राहील. पुढच्या काही वर्षांमध्ये भारताची 6% वेगाने भारती अर्थव्यवस्थेची (Indian Economy) वृद्धी होईल, असे अनुमान एस अँड पी ग्लोबल रेटींग्जने (S&P Global Ratings) आपल्या नुकत्याच (सोमवार, 26 जून) जाहीर केलेल्या अहवालात नोंदवले आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताची वाढ पुढील तीन वर्षांसाठी 6.7 टक्के राहण्याची शक्यता आहे. आशियातील उदयोन्मुख आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन या अहवालात करण्यात आले आहे. अहवालाचा एकूण नूर पाहिला तर एस अँड पीने भारतावर विशेष जोर दिल्याचेही निदर्शनास येते.
भारत, व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससह विकासाच्या मुद्द्यावर आघाडीवर राहतील. हे देश 2026 मध्ये आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहतील. सन- 2023-2026 मध्ये अनुक्रमे 6.7%, 6.6% आणि 6.1% च्या सरासरी वाढीसह भारत, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स आघाडीवर आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार भारताच्या आर्थिक वृद्धीचा अंदाजे वेग वर्ष 2024 मध्ये 6% वाढीचा वर्तवला आहे.
दरम्यान, विद्यमान अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पाहायचे तर खाजगी ग्राहकांची मागणी कमी होत आहे. तुलणेत शहरी ग्राहक ग्रामीण भागापेक्षा चांगले काम करत आहेत. खास करुन कृषी आणि बांधकाम क्षेत्रामध्ये भारताने अधिक लवचीक धोरण आणि वाढ दर्शवली आहे. पुढच्या काही काळामध्ये भारतात भक्कम गुंतवणूक आणि देशांतर्गत ग्राहकांच्या मागणीमुळे आम्हाला 7% च्या जवळपास वाढ अपेक्षित आहे, असेही हा अहवाल म्हणतो. S&P च्या मते, किरकोळ महागाई 6.7 टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षात 5 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा, World's Largest Road Network: चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वात मोठे रोड नेटवर्क असलेला दुसरा देश; गेल्या 9 वर्षात 7 वर्ल्ड रेकॉर्ड- Minister Nitin Gadkari)
S&P ग्लोबल रेटिंग्स
S&P ग्लोबल रेटिंग्स ही एक प्रसिद्ध जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. जी कॉर्पोरेशन, सरकार आणि वित्तीय संस्थांसह विविध संस्थांचे स्वतंत्र क्रेडिट रेटिंग, संशोधन आणि विश्लेषण प्रदान करते. हा S&P Global चा एक विभाग आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणून, S&P ग्लोबल रेटिंग्स क्रेडिट रेटिंग नियुक्त करून संस्थांची क्रेडिट पात्रता आणि जोखीम प्रोफाइलचे मूल्यांकन करते. S&P ग्लोबल रेटिंग्स द्वारे प्रदान केलेली रेटिंग गुंतवणूकदार, सावकार आणि बाजारातील इतर सहभागींना गुंतवणुकीशी संबंधित क्रेडिट जोखमीचे मूल्यांकन करण्यात आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते.