अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्त्री नुकतेच पटना मध्ये दाखल झाले आहेत. तेथे दाखल होताच त्यांनी तेज प्रताप यादव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भारत हे हिंदुराष्ट्र होण्याबद्दल शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी विधान केले आहे. तेज प्रताप यादव यांनी बागेश्वर धामच्या बिहार भेटीला विरोध केला होता आणि ते म्हणाले होते की जर ते हिंदू-मुस्लिम करण्यासाठी येथे येत असतील तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. पाटना मध्ये दाखल होताच शास्त्रींनी मीडीयाशी बोलताना आपण इथे आपण हिंदू-मुस्लिम' करायला आलो नाही. राजकीय नेता नसल्याने मी केवळ सनाधम धर्माच्या प्रचारासाठी बिहारला आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Self-Styled Godman Dhirendra Shastri Alias Bageshwar Dham Sarkar Arrives in Patna, Says Its Just Hindus for Him Not Hindu-Muslims #DhirendraShastri #BageshwarDhamSarkar #Patna #Bihar https://t.co/7S8FcbmggB
— LatestLY (@latestly) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)