Cracks on JP Ganga Setu Bridge: बिहारमध्ये जेपी गंगा सेतू (JP Ganga Bridge) या हाय-प्रोफाइल पायाभूत सुविधांनी भव्य असलेल्या पूलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, काही दिवसांनीच त्या पूलाला भेगा पडल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 9 एप्रिल रोजी पुलाच्या दिदारगंज-दिघा भागाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत केले. मात्र, कंगन घाट ते दिदारगंज हा मार्ग वाहनांसाठी खुला केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच, दिदारगंजमधील पिलर क्रमांक ए-3 जवळ भेगा पडल्या आहेत. 3 हजार 831 कोटी रुपयांच्या प्रचंड खर्चाने बांधलेला हा प्रकल्प आता कडक तपासणीच्या अधीन आहे.
पटना के JP Ganga Setu में दरार... 3831 करोड़ की लागत से बना पुल उद्घाटन के तीन दिन बाद ही दरका #Patna #NitishKumar #JPGangaBridge #Bihar | @ShashiReporter pic.twitter.com/9bFvbZN7Vu
— AajTak (@aajtak) April 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)