विहीरीत पडलेल्या नीलगायची वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सुटका करण्यात आली आहे. ही घटना बुलठाणा येथे घडली. बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात वनगाय विहीरीत पडल्याची माहिती स्थानिक वन विभागाला कळली. त्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना वनगाय विहीरीत पडल्याचे आढळून आले. त्यानी मग तातडीने मदत आणि बचाव कार्य अवलंबिले. एका मजबूत आणि लांब दोरखंडाच्या मदतीने त्यांनी वनगायला मोठ्या शथापीने विहीरीबाहेर काढून जीवदान दिले. वन विभागाच्या या कार्याचे परिसरताली नागरिकांनी कौतुक केले.
ट्विट
Buldhana Cow Resque _ बुलढाण्यात नीलगाय विहरीत पडली, वनविभाग अधिकाऱ्यांकडून सुटका.#cowresque #maharshtra #buldhana pic.twitter.com/wxwLnOuvK2
— ABP माझा (@abpmajhatv) December 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)