Shivling found in Sindkhedaraja: सिंदखेडराजा (Sindkhedaraja)येथे ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. याच दरम्यान १९ मे रोजी तेथे यादवकालीन शिवमंदिराचे(Shiva temple) अवशेष सापडले आहेत. राजे लखोजीराव जाधव (Lakhojirao Jadhav) यांच्या समाधी परिसरात केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या दरम्यान समाधीच्या चौथऱ्यापासून पाच फूट खोल व समाधी मंदिरापासून साधारण २० फूट अंतरावर मोठे शिवलिंग आढळून आले. शिवलिंगाच्या बाजूला दर्शनी भागात सुबक नक्षीकाम असलेली चौकट मिळून आली.शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणे राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे तेथे उत्खननाचे काम सुरू आहे.(हेही वाचा:Flamingos Found Dead in Mumbai: विमानाशी धडक झाल्याने 40 फ्लेमिंगो पक्षी ठार, मुंबई येथील घाटकोपर परिसरातील घटना )

पोस्ट पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)