Flood In Himachal Pradesh: गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दल हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत पुरवत आहे. 11000 किलोपेक्षा जास्त मदत सामग्री दुर्गम भागात नेण्यात आली आणि 4 रुग्णांना बाहेर काढण्यात आले. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)