पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री श्री. शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पीएम मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे. (हेही वाचा: Women Demand Free Bus Services: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 94% महिलांची मोफत बस सेवेची मागणी: Greenpeace India Report)
केंद्राकडून 14 पूरग्रस्त राज्यांना पुनर्वसनासाठी 5,858 कोटी रुपये जारी-
पूरग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले.१४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रधानमंत्री @narendramodi व केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांचे आभार मानले आहेत. pic.twitter.com/5tMPLMTFKF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)