Maharashtra Cabinet Decisions: झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात, अवकाळीग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने सादर केले जाणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय
या निर्णयांमध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर केले जाणार, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात अशा काही महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर केले जाणार, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात अशा काही महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. (हेही वाचा: Weather Forecast: अवकाळी पाऊस यायचं म्हणतोय! बळीराजाला चिंता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज)
✅ अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार.
✅ झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा.
✅ राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान. शाळांचे मूल्यांकन…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2023 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

