Weather Forecast: अवकाळी पाऊस यायचं म्हणतोय! बळीराजाला चिंता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Weather Forecast | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Unseasonal Rains in India: यंदाचा मान्सून कोरडाच गेला. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ओढाताण करुन शेती कसली. पाण्याने ओढ मिळालेली पिके कशीबशी तग धरुण आहेत. अशातच आता अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट आभाळात घोंगावू लागल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजात देशात आणि राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामना खात्याचा अंदाज (Maharashtra Weather Forecast) अचूक ठरला तर राज्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक सरींसोबत पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. चिंतेची बाब अशी की, काही ठिकाणी गारपीट होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी लागू असेल. भारतातील अवकाळी पाऊस अलीकडच्या काळात (ज्याला अनेकदा अवकाळी किंवा अनपेक्षित पाऊस म्हणून संबोधले जाते) चिंतेचा विषय बनला आहे. या हवामानातील विसंगतींमुळे मान्सूनच्या पारंपारिक पद्धतींमध्ये व्यत्यय येतो. त्याचा शेती, अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांच्या एकूण उपजीविकेवर परिणाम होतो.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजांचा सोसाट्याचा वारा, विजांचा गडगडाटांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात साधारण हलका पाऊस पाहायला मिळेल. तर अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्रालगतच्या भागामध्ये हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने देशाच्या विविध भागात पावसाची स्थिती पाहाला मिळत आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, काही भागात अवकाळीसह गारपीटचा धोका)

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांपुढे मोठेच आव्हान निर्माण झाले आहे. आगोदरच दुष्काळ. त्यातही अपूऱ्या पाण्यावर पिके कशीबशी सांभाळली. असे असताना जर पावसाने आपली हजेरी लावली तर शेतकऱ्याला हवाहवासा असणारा पाऊस राक्षस ठरणार आहे. बदलत्या वातावरणामुळे आकाश ढगाळ राहील. परिणामी वातावरणातही थंडावा निर्माण होईल. ज्यामुळे शेतपीकांसाठी हानिकारक असेल. शिवाय, द्राक्ष, हरबरा आदी पिकांवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम पाहायला मिळेल.

एक्स पोस्ट

दरम्यान, पावसाची शक्यता पाहता हवामान विभागाने बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस बंगालच्या उपसारगात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहेत. परिणामी पुढचा काही काळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा आणि नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचा ठरणार आहे.