भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा - Maratha Reservation Row: जालन्यातील दगडफेकीप्रकरणी 4 जणांना अटक; शस्त्रे आणि दारूगोळा जप्त)
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातही जोरदार पावसाती शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस रब्बीतील ज्वारी, हरबरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे.