Video: देशात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजरातमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. अशात आनंद जिल्ह्यातील खंभात येथे पावसाच्या पाण्यात कार वाहून गेली. पुराच्या पाण्यात कागदी बोटीप्रमाणे कार वाहून गेल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. रस्त्यावर नदी स्वरूप पाणी वहात आहे गुजरातच नाही तर अनेक शहरांमध्ये पाऊस पडत असून अनेक ठिकाणाहून नागरिकांच्या जीवितहानीच्या बातम्या येत आहेत. याआधीही नदी-नाल्यांमध्ये गाड्या तरंगतानाचे व्हिडिओ समोर आले होते.हेही वाचा: Flood in Bangladesh: बांगलादेशातील पुरामुळे 13 लोकांचा मृत्यू, 40 लाखांहून अधिक लोक प्रभावित
गुजरात के आनंद जिले के खंभात में भारी बारिश के बाद सड़कें नदी बनीं, जलभराव में एक गाड़ी बह गई है।#Gujarat #Anand #Khambhat #HeavyRain #Flooding #WaterloggedStreets #CarWashedAway #Monsoon2024 #RainHavoc pic.twitter.com/vX3opoUdYy
— Bastar Talkies (@BastarTalkies) August 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)