Covovax: भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून तीन हजारांहून अधिक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. इतकेच नाही तर सोमवारी भारत पुन्हा एकदा जगातील पाच देशांमध्ये सामील झाला आहे, जिथे गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. यामध्ये SII ने, प्रौढांसाठी विषम बूस्टर डोस म्हणून कोविन पोर्टलमध्ये कोविड लस Covax चा समावेश करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता सीरम इन्स्टिट्यूटची ही मागणी मान्य झाली असून नागरिकांना CoWIN वर लवकरच 225 रुपये प्रति विषम बूस्टर मिळणार आहे.
SII's Covid vaccine Covovax as heterologous booster for adults to be available on CoWIN soon; to cost Rs 225 per dose plus applicable GST: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)