Delhi Weather Update: दाट धुक्यामुळे शनिवारी दिल्लीतील 96 उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात आला. शुक्रवारीदेखील अशीच परिस्थीती पहायला मिळाली. शुक्रवारी विमानसेवांवर गंभीर परिणाम झाला. जवळपास 80 टक्के उड्डाणांना उशीर (Flights Delayed) झाला. सुमारे 200 उड्डाणे अशी होती ज्यांचे प्रस्थान दीड ते दोन तास उशिराने होते. दरम्यान, आज शनिवारी देखील प्रवाशांची चिंता कायम आहे. विमान सेवा(Delhi Airport) सरासरी 35 मिनिटे उशीराने आहे. दृश्यमानता कमी असल्याने रेल्वेसेवेवरही विलंब झाला आहे. थंडीची लाट वाढल्याने दैनंदिन प्रवास करणे आव्हानात्मक बनले आहे.

96 उड्डाणे रद्द; अनेक विमानांचा मार्ग बदलला

शहरातील प्रमुख ठिकाणांवरील परिस्थीती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)