मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मंबई महापालिका आणि मुंबई पोलीस आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असतानाही वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळी गडद धुके पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला सायंकाळी आणि दुपारीही धुके पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता उन्हामध्ये धुके जाणवत नसले तरी थोडे जरी आभाळ आले तरी आकाशात काळे ढग पाहायला मिळतात. रस्त्यांवरही धूळ आणि धुके पाहायला मिळते. वृत्तसंस्था एएनआयने एक्स हँडलवर शेअर केलेल्या मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील व्हिज्युअलमध्येही हे धुके पाहायला मिळते आहे. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज, धूर ओकणाऱ्या वाहनांवर ठेवणार करडी नजर)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)