Air India Express Flight Video: बेंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विमान उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनला आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. आग लागताच पायलटने तातडीने बेंगळुरु विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिग केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाच्या इंजिनमधून आग आणि धूर निघताना दिसत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, वेळीच सावध राहून इमर्जन्सी लॅंडिग केले आणि सर्व प्रवाशी सुखरुप उतरले. (हेही वाचा- रामपूर जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही)
Air #India flight from #Bengaluru to #Kochi made an emergency landing at Bengaluru airport due to fire in one of the engines. All 179 passengers and six crew members were evacuated successfully. #Karnataka pic.twitter.com/s6IO1eceyH
— Imran Khan (@KeypadGuerilla) May 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)