तेलगू चित्रपट निर्मात्यांनी ‘उद्योगाची पुनर्रचना’ करण्यासाठी 1 ऑगस्टपासून चित्रपटांचे शूटिंग (Shooting Stop) थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड लॉकडाऊनमुळे (Covid) चित्रपट उद्योगाला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीचा खर्च अनेक पटींनी वाढला असून कोरोनामुळे सिनेमा हॉलची कमाई खालच्या पातळीवर पोहोचली आहे. अनेक निर्मात्यांनी गेल्या दोन दिवसांत हैदराबादमध्ये बैठका घेऊन चित्रपट उद्योगाचे अस्तित्व वाचवण्यासाठी गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत 1 ऑगस्टपासून तेलुगू सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत निर्मात्यांनी एक प्रेस नोट जारी केली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)