Happy Birthday Kamal Haasan: चाहत्यांनकडून कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनयासोबतच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक अशी अनेक क्षेत्रात त्यांनी खुबीने काम केले आहे. राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळतो. आज वाढदिवसानिमित्त सगळ्या क्षेत्रातुन त्याच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे.

Happy Birthday Kamal Haasan: चाहत्यांनकडून कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Kamal Haasan | (Photo Credits: Facebook)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवडूमध्येदेखील आपल्या अभिनयाच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे अभिनेता कमल हसन (Kamal Hasan) यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. कमल फक्त एक अभिनेता नसून एक अष्टपैलूव्यक्तिमत्व आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक अशी अनेक क्षेत्रात त्यांनी खुबीने काम केले आहे. राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळतो. आज वाढदिवसानिमित्त सगळ्या क्षेत्रातुन त्याच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे.

चाहत्यांन कडून कमल हसन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

कमल हासन यांनी एक बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘कलाथुर कन्नामा’ हा त्यांचा पहिलावहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यातील ‘चाची 420’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत कमल हासन यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकेचे कौतुक झाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2021 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).