Ankit Kumar Dies by Suicide: इन्स्टाग्रामवर राणी कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या तसेच मुलींसारखी वेशभूषा करून व्हिडीओ बनवणारा बिहारचा प्रसिद्ध युट्यूबर अंकित कुमार याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. युट्यूबर आणि रिल स्टार अंकितने आईसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिल्ससाठी मुलीचा ड्रेस परिधान करणाऱ्या अंकित कुमारचे हजारो फॉलोअर्स होते. इन्स्टाग्रामवर राणी कुमारी या नावाने त्यांची ओळख होती आणि त्याचे तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अंकित कुमारच्या आईला त्याचे असे वागणे आवडत नसे, प्रसिद्धीसाठी अंकित मुलींसारखी वेशभूषा करत असे त्यामुळे अंकित आणि त्याच्या आई सोबत चांगलेच खटके उडत असे. आत्महत्येच्या दोन तास आधी अंकित कुमारने एक रील शेअर केली होती ज्यात तो आनंदी दिसत होता. हेही वाचा: Dwarkanath Sanzgiri Dies: क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
येथे पाहा पोस्ट:
Young YouTuber Who Dressed as a Girl for Reels Dies by Suicide
▶️ Ankit Kumar created reels dressed as a girl, gaining thousands of followers.
▶️ His mother disapproved and frequently scolded him.
▶️ After a heated argument, he ended his life.
▶️ Just two hours before his… pic.twitter.com/HHtahNKh0a
— Sneha Mordani (@snehamordani) February 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)