हिवाळी हंगाम 2019: Google ने Doodle बनवून नव्या उत्तरायणरंभाच्या दिल्या शुभेच्छा
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने आज हिवाळी हंगाम 2019 च्या शुभेच्छा देण्याासाठी खास डुडल सादर केले आहे. या डुडलच्या माध्यमातून त्यांनी नव्या ऋतुच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या आहेत. तसेच 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याचे म्हटले जाते. आज पासून उत्तरायणाला सुरुवात होते.
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने आज हिवाळी हंगाम 2019 च्या शुभेच्छा देण्याासाठी खास डुडल सादर केले आहे. या डुडलच्या माध्यमातून त्यांनी नव्या ऋतुच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या आहेत. तसेच 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याचे म्हटले जाते. आज पासून उत्तरायणाला सुरुवात होते. त्यामुळेच Winter Solstice च्या माध्यमातून गुगलने डुडलचे महत्व पटवून दिले आहे. आजच्या दिवशी दिवस लहान आणि रात्र मोठी असते. त्याचसोबत सूर्य हा पृथ्वीपासून दूर असण्यासोबत चंद्राचा उजेड अधिक वेळ राहत असल्याचे मानले जाते.
"सूर्यप्रकाश" हा शब्द लॅटिन सॉल्स्टीटियमपासून उद्भवला ज्याचा अर्थ "सूर्य स्थिर आहे", जेव्हा 'सूर्याच्या मार्गाची हालचाल' थोडक्यात थांबते. उत्तरायाणास सुरुवात होते कारण पृथ्वी त्याच्या परिभ्रमणच्या अक्षावर सुमारे 23.5 अंश वाकलेली असते आणि झुकल्यामुळे प्रत्येक गोलार्धात वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. गोलार्धाचा खरा अर्थ म्हणजे पृथ्वीचा अर्धा हिस्सा असा होतो.(ग्रीष्म ऋतु Google Doodle: दक्षिणायनाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गूगल चं खास Summer Season डूडल)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2019 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

