Watch Video: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा 'हा' व्हिडिओ वायरल
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

शिवसेना (Shivsena) आणि भाजप (Bharatiya Janata Party) हे दोन्ही पक्ष राज्यात तसेच केंद्रात मागील पाच वर्षांपासून अगदी मांडीला मंडी लावत सत्तेत बसले आहेत. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकत्र लढवायची ठरवली. दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये आधी जागा वाटपावरून वाद निर्माण झाले तर आता राज्यातील सत्ता स्थापनेवरून.

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने दर्शवल्यानुसार भाजप आणि शिवसेना महायुती 220 हुन अधिक जागांवर विजय मिळणार होती. परंतु तो अंदाज फेल ठरवत भाजप ने फक्त 105 जागा काबीज केल्या तर शिवसेनेने फक्त 56 जागी विजय मिळवला.

पण निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मात्र असून बसले आहेत आणि त्यांनी भाजपवर दबाव आणायला सुरुवात केली. दोन्ही पक्षांची सध्याची अवस्था बघता 'तुझं माझं जमेना तुच्यावाचून करमेना' अशीच झाली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या शिवाय 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर

या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन एका गाण्याचा व्हिडिओ युट्युबवर शेअर करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा वापरून हा व्हिडिओ बनवण्यात आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील 'गोमू संगतीनं' या गाण्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात आला असून सुबोध भावे ऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आणि प्राजक्ता माळी ऐवजी उद्धव यांचा चेहरा या गाण्यात दाखवण्यात आला आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे उद्धव यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवलं आहे. तर दुसरीकडे उद्धव हे अडून बसले आहेत. ते देवेंद्रांसोबत यायला तयार नाहीत, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.