Qawwali Event in Haridwar | (Photo Credits: ANI)

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील हरिद्वार (Haridwar) जिल्ह्यात कव्वाली (Qawwali) गायनाच्या एका कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरुन उपस्थितांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. या वेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओमध्ये प्रेक्षक हे अत्यंत बेभान झालेले आणि एकमेकांना खुर्च्याने मारहाण करताना दिसत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ ट्विट केला आहे. प्राप्त माहितीनुसार उपस्थित प्रेक्षकांतील दोन गटांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गट एकमेकांवर धाऊन गेले. यात दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांना लाता-बुक्क्यांनी प्रहार तर केलेच पण बसण्यासाठी ठेवललेल्या खुर्च्यांची फेकाफेकही केली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, VIDEO: भंडारा येथे पोलिसांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, एकमेकांना बुटाने चोप; आरोपीला खर्रा देण्यावर वाद)

एएनआय ट्विट

सांगितले जात आहे की, दोन्ही गटांपैकी एका गटातील एका युवकाने दुसऱ्या गटावर खुर्ची फेकली. तरुणाने खुर्ची फेकताच वादाला सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला काबूत आणले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची तसेच काणाला अटक झाल्याचे वृत्त नाही.