Lok Sabha Elections 2019: राष्ट्रीय जनता दल (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे थोरले चिरंजव तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav ) यांनी बिहारच्या राजकारणात वेगळी चूल मांडली. तेज प्रताप यादव यांनी आरजेडीतून बाहेर पडत नव्या पक्षाची घोषणा सोमवारी (1 एप्रिल) केली. तेज प्रताप यांनी आपल्या पक्षाचे नाव 'लोलू राबडी मोर्चा' (Lalu Rabri Morcha) पार्टी असे ठेवले आहे. उल्लेखनिय म्हणजे आपला पक्ष (लालू राबडी मोर्चा पार्टी) लोकसभा निवडणूकीत 20 जागा लडवेन असा इशाराही त्यांनी दिला.
आपल्या नव्या पक्षाच्या वतीने आपण सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. तर, जहानाबाद आणि शिवहर या मतदारसंघातूनही ते आपल्या पसंतीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या विचारात आहेत. बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांनी छात्र राष्ट्रीय जनता दल प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, आपले छोटे बंधू तेजस्वी यादव यांची आरजेडीवर असलेली पकड आणि तीव्र विरोधामुळेच आपण हे पाऊल उचलत असल्याचे तेज प्रताप यांनी म्हटले आहे.
तेज प्रताप यादव तेज प्रताप यादव
तेजप्रताप यादव यांनी एक ट्विटही केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अनोख्या अंदाजात तेज प्रताप यांनी म्हटले आहे की, 'छात्र राष्ट्रीय जनता दलाच्या प्रमुख पदाचा आपण राजीनामा देत आहोत. ते लोक मूर्ख आहेत जे मला मूर्ख समजत आहेत. कोण किती पाण्यात आहे हे सर्व मला माहित आहे', असे तेज प्रताप यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Aishwarya Rai- Tej Pratap Yadav Divorce : तेज प्रताप यांचा ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटाचा निर्णय मागे)
#Bihar: Tej Pratap Yadav launches 'Lalu Rabri Morcha' in Patna, says, "We demand two Lok Sabha seats of Sheohar and Jehanabad." pic.twitter.com/2xCTUXg2mg
— ANI (@ANI) April 1, 2019
तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात गेल्या काही काळापासून पक्षावरली (आरजेडी) वर्चस्ववादातून संघर्ष सुरु होता. लोकसभा निवडणूक जागावाटपादरम्यान हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. त्यातूनच जहानाबाद मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे तेज प्रताप यादव यांनी म्हटले होते.