Aishwarya Rai- Tej Pratap Yadav Divorce : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या घटस्फोटावर आज सुनावणी होणार होती. मात्र आता तेज प्रताप सिंहने ऐश्वर्या राय हिच्या सोबत होणाऱ्या घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या घरातील मंडळी खूप खुश झाली आहेत.
तेज प्रताप यादव याने पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्या सोबत 12 मे रोजी लग्न केले होते. तर लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यातच तेज प्रताप यादव याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तर ऐश्वर्या सोबत जबरदस्तीने लग्न केले असल्याचे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र या घटनेमुळे लालू प्रसाद यादव यांच्या घरातील मंडळींना धक्का बसला होता. तर आज तेज प्रताप याने घटस्फोटाबाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे घरातील मंडळी खूप खुश झाली असणार आहेत.
तर तेज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय ही RJD नेता चंद्रिका राय(Chandrika Rai) यांची मुलगी आहे. तसेच बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय (Daroga Prasad Rai) यांची ती नात आहे.