VIDEO: कोहली चाचू... चिमुकल्या फॅनची हाक ऐकून विराटने दिली रिअ‍ॅक्शन , व्हिडिओ व्हायरल
Virat Kohli chachu | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

विराट कोहली (Virat Kohli), जगातील एक यशस्वी आणि तितकाच सुप्रसिद्ध खेळाडू आहे. हे आपण जाणताच. आजघडीचा सर्वात लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू मैदानावर आणि मैदानाबाहेर अशा दोन्ही ठिकाणी चर्चेत असतो. त्यामुळे कोहलीची प्रत्येक स्टाईल लोकप्रिय होते. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही (Virat Kohli fans) प्रचंड मोठा आहे. पण, लोकप्रियतेच्या शिखरावर असून तो चाहत्यांना शक्यतो कधी नाराज करत नाही. कधीमधी होणाऱ्या फटकेबाजीमुळे तो ट्रोलही होतो. तसेच, त्याच्यावर उद्धटपणाचा आरोपही होतो. पण, तरीही तो लोकप्रियतेच्या शिखरावरच राहतो. सोशल मीडियात विराटचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओत एक चिमूकली विराटला चक्क कोहली चाचू (Kohli chachu) म्हणून आवाज देते आहे. विराटनेही मग तिची साद पाहून दाद दिली. विराटची दात पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओच पाहावा लागेल.

प्राप्त माहितीनुसार हा व्हिडिओ मेलबर्न येथील आहे. भारतीय संघ बसमध्ये जात असताना विराट कोहलीला एका चिमुकलीने ऑटोग्राफची फर्माइश केली. विशेष म्हणजे विराटनेही मग ही फर्माइश ताबडतोब पूर्ण केली. या वेळी चिमूकलीने विराटला 'विराट चाचू' म्हणून घातलेली साद उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरली. बसमध्ये जात असताना विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. तसेच, एका चाहत्याने दिलेले ख्रिसमस गिफ्टही विराटने स्वीकारले. तर, काही चाहत्यांसोबत सेल्फीही घेतली. (हेही वाचा, Video: भाजप आमदार प्रविण दरेकर मैदानावर शॉट मारायला गेले अन भूईसपाट झाले)

विराट कोहली हा जसा मैदानावर चर्चेचा विषय असतो. तसाच तो मैदानाबाहेरही अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. मागे एकदा 'जर भारतीय खेळाडू आवडत नाहीत तर, देश सोड' असा सल्ला विराटने एका चाहत्याला दिला होता. त्यावरुन तो सोशल मीडियात ट्रोल झाला होता. तर, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाहा यांनी विराटची संभावना चांगला पण उद्धट खेळाडून अशी केली होती. तेव्हाही तो चर्चेत आला होता.