Viral Video: सिंहासारखा भयानक शिकारी प्राणी जंगलावर राज्य करतो, म्हणून त्याला जंगलाचा राजा म्हणतात. तर हत्ती हा जंगलातील सर्वात हुशार प्राणी मानला जातो, जो सामर्थ्यवान तसेच अतिशय हुशार असतो. यामुळेच हत्तींशी संबंधित व्हिडीओ जेव्हाही सोशल मीडियावर पाहिले जातात तेव्हा ते खूप पसंत केले जातात. दरम्यान, एक हृदय जिंकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रचंड ताकदवान हत्ती अशा प्रकारे आपली हुशारी दाखवतो हे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ X वर @WildfriendsUG नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत लिहिलेले कॅप्शन आहे- खरी शक्ती दाखवण्यात नाही, तर संरक्षण करण्यात आहे. त्यामुळेच हत्तींची गणना बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते.
येथे पाहा व्हिडीओ:
'Be careful'...elephant bull demonstrates emotional intelligence - being aware of his enormous size, this gentle giant is trying to live in harmony with this family of warthogs. You can't fail to love elephants. 🐗🐘 pic.twitter.com/HJ13BbvVIr
— Wildfriends Africa (@WildfriendsUG) October 21, 2024
व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की, हत्ती हा दयाळू प्राणी आहे. यावर उत्तर देताना एका युजयने लिहिलं आहे - खरं तर शक्तिशाली असूनही हत्ती दयाळू असतात. तर दुसऱ्याने लिहिले आहे - जर तो दुसरा प्राणी असता तर तो त्याला ठेचून तिथून निघून गेला असता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती जंगलातून जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गजराजसमोर अचानक डुकरांचा कळप येतो. डुकरांचा कळप पाहिल्यानंतर गजराज अचानक थांबतो. डुकरांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून हत्ती आपले पाय पुढे करत नाही. या व्हिडिओमध्ये हत्तीने आपल्या ताकदीचे आणि संवर्धन बुद्धिमत्तेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.