
Nicholas Pooran Singing Hindi Song: आयपीएल-2025 (IPL 2025) मध्ये सध्या निकोलस पुरन (Nicholas Pooran) त्याच्या फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. तो जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा विरोधी संघांच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो. पण आता त्याच्याकडे फलंदाजी व्यतिरीक्त आणखी एक छूपी कला असल्याचे समोर आले आहे. तो गाणीही गातो, नुकतच त्याने हिंदीत एक गाण (Nicholas Pooran Sings Bollywood Song) गायल. त्यावेळी त्याचा संघ त्याच्यासोबत होता. निकोलसच गाण एकूण पंतसह सर्वांना धक्का बसला. भारतीय नसून हिंदीत गाणे गाणे ही आर्श्चयाची गोष्ट आहे.
काल आयपीएल 2025 चा लखनौ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना झाला. त्या सामन्यापूर्वी, लखनौने त्यांच्या इंस्टाग्रामवर निकोलसचा हा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये पूरन त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत गाणे गाताणा दिसतो. तो ‘ओ करम खुदाया’ हे प्रसिद्ध बॉलीवूड गाणे गात आहे. MS Dhoni Milestone: एमएस धोनीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
View this post on Instagram
आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये पूरनने 349 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 215.43 राहिला आहे. यावरून पुरण कोणत्या स्वरूपात आहे हे दिसून येते. पण धोनीच्या सीएसकेविरूद्ध मात्र निकोलस पुरन फेल ठरला. निकोलस पुरन आपल्या नेहमीच्या अंदाजात चेन्नईसमोर मोठी कामगिरी करू शकला नाही. पुरन फक्त 8 धावा करत माघारी परतला.