आजकाल चमकदार, तजेलदार त्वचा मिळविण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. चांगले खाणे, भरपूर पाणी पिणे आणि चेची काळजी घेणारी विविध उत्पादने वापरणे हे महिलांसह पुरुषांमध्येही अगदी सामान्य झाले आहे. अशात एका व्यक्तीने चक्क पिंपलमुळे नोकरी सोडल्याची घटना घडली आहे. एका पुरुषाने रेडिटवर याबाबत माहिती दिली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर ताणतणाव, वाईट बॉस, जास्त वेळ काम करणे किंवा चांगल्या नोकरीची ऑफर आल्याने लोक नोकऱ्या सोडतात, मात्र रेडिटवर या पुरुषाने सांगितले की, पिंपल येणे या आरोग्य समस्येमुळे त्याच्या सहकाऱ्याने नोकरी सोडली.
त्याने सांगितले की, त्याच्या कंपनीत एका व्यक्तीला यंत्रसामग्रीचे काम करण्यासाठी ठेवले होते. या कामात यंत्रे इथेनॉलने स्वच्छ करावी लागत होती. महिनाभर काम शिकल्यानंतर त्या व्यक्तीने अचानक नोकरी सोडली. याचे कारण त्याने सांगितले की, त्याच्या कपाळावर एक मुरुम होता. त्याने या पुरुषाला मेसेज केला की, त्याने यापूर्वी कधीही मुरुम पाहिले नव्हते आणि आता कामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्याच्या चेहऱ्यावर पिंपल आले आहेत. म्हणून तो आता या ठिकाणी काम करू शकत नाही. आपल्यासाठी ही मोठी आरोग्य समस्या असल्याचे त्याने सांगितले होते. (हेही वाचा: Coimbatore Shocker: मासिक पाळीच्या दिवसात दलित मुलीला वर्गाबाहेर बसून परीक्षा देण्यास भाग पाडले; कोइम्बतूर मधील संतापजनक प्रकार)
Employee Quits Job Over Pimple:
BIZARRE! Man claims his coworker quit job because of a pimple: 'I was so worried'https://t.co/ewvbrUOZh3
— DNA (@dna) April 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)