Pune IT Job Walk-in Interview: कोरोना महामारीनंतर जगभरात मंदी सुरु झाली. अजूनही कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करत आहेत. फ्रेशर्ससह अनुभव असलेल्या लोकांनाही नवी नोकरी मिळवण्यात अडचण येत आहे. याचे भयानक वास्तव मांडणारे एक दृश्य पुण्यात समोर आले आहे. पुण्य्तील अभियंत्यांच्या वॉक-इन इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे भारताच्या आयटी जॉब मार्केटमधील कठीण स्पर्धेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडीओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचे दिसत असून, येथे ज्युनियर डेव्हलपरच्या 100 पदांसाठी तब्बल 3 हजारांहून अधिक अभियंते कंपनीबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. वॉक-इन-इंटरव्यूहसाठी ही भलीमोठी रांग पाहून बेरोजगारीचं चित्र किती विदारक आहे हे दिसून येत आहे.
आयटी टॅलेंटचे भरभराटीचे केंद्र म्हणून पुण्याची ख्याती असूनही, नोकर भरतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेले तरुण ही बाब नवीन कामाबाबतची आव्हाने अधोरेखित करते. नवीन पदवीधर आणि अनुभवी नोकरी शोधणारे दोघेही मर्यादित पदांसाठी स्पर्धा करत आहेत, जे भारतीय रोजगार बाजारपेठेतील व्यापक समस्या प्रतिबिंबित करतात. (हेही वाचा: Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती)
Pune IT Job Walk-in Interview-
How bad is the job market!
3000 people lined up outside an IT company in Hinjewadi, Pune for a walk-in drive to hire a junior developer. pic.twitter.com/A3MzHYj41r
— Ravi Handa (@ravihanda) January 25, 2024
ये इंजीनियर्स हैं।
जो वॉक-इन इंटरव्यू के लिए कतार में खड़े हैं।
📍 पुणे pic.twitter.com/pJKG3SZP1J
— Govind Pratap Singh | GPS (@govindprataps12) January 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)