EY Pune मुळे 26 वर्षीय सीए कर्मचारी Anna Sebastian Perayil च्या निधनाने अनेकजण हळहळले आहेत. दरम्यान मृत तरूणीच्या आईने कंपनी मध्ये तिला अति ताण होता आणि तो असहय्य झाल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी असलेला ताण आणि असुरक्षित वातावरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता यावरून सोशल मीडीयात चर्चा सुरू झाली आहे. याची आता सरकारने देखील दखल घेतली आहे. आईने केलेल्या आरोपांचा तपास केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. EY ने स्टेटमेंट जारी करत कंपनीमध्ये चांगलं वातावरण राहील आणि ते सुधारेल याचे प्रयत्न केले जातील असं म्हटलं आहे.  नक्की वाचा: EY Pune च्या 26 वर्षीय CA चा मृत्यू; कंपनीच्या कार्यपद्धतीने जीव घेतल्याचा दावा करत आईने केला Rajiv Memani यांना इमेल.

केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून अ‍ॅना च्या मृत्यूची दखल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)