Photo Credit- X

Jaat Box Office Collection Day 2: सनी देओलचा (sunny deol) बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा चित्रपट 'जाट'(Jaat)ची सुरुवात पहिल्या दिवशी चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली. गुरुवारी (महावीर जयंती) सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला. शुक्रवारी कामकाजाचा दिवस असल्याने कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9.62 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा 7 कोटी रुपयांवर घसरला. अशाप्रकारे, 'जाट'ची आतापर्यंतची एकूण कमाई 16.62 कोटी रुपये झाली आहे.शहरी भागात चित्रपटाची कामगिरी तुलनेने खराब राहिली. आता सर्व आशा आठवड्याच्या शेवटी आहे. चित्रपटाने दिवस चांगली कमाई केली तर येत्या काळात 'जात' सहजपणे 50 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करू शकेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)