Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Harbour Line Train Services Disrupted: मुंबई लोकल ट्रेनसंदर्भात मोठी बातमी (News About Mumbai Local Train) समोर येत आहे. मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान (Mankhurd and Vashi stations) ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने (Banner Falls on Overhead Wires) मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील मुंबई लोकल सेवा सोमवारी दुपारी विस्कळीत झाली. ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर बॅनर अडकल्याने रेल्वे सेवा एक तासाहून अधिक उशिराने सुरू झाली, ज्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत (Harbour Line Train Services Disrupted) झाली.

मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि पनवेल दरम्यान डाउन हार्बर लाईनवर दुपारी 3:44 वाजता ही घटना घडली. बॅनर थेट ओव्हरहेड वायरवर पडल्याने बेलापूरला जाणारी लोकल ट्रेन मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान थांबवण्यात आली. बॅनर सुरक्षितपणे काढण्यासाठी, तारांचा वीजपुरवठा बंद करावा लागला, ज्यामुळे अनेक गाड्या रुळांवर बऱ्याच वेळ उभ्या राहिल्या. (हेही वाचा -Women's Safety in MSRTC Buses: एमएसआरटीसी सर्व बसेसमध्ये बसवणार पॅनिक बटणे आणि बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे; महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय)

दरम्यान, डाउन हार्बर लाईनवरील सीएसएमटी-पनवेल येथे, मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान दुपारी बेलापूर लोकलला एक बॅनर ओव्हरहेड वायरवर लागला. त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली. बॅनर काढण्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे ट्रॅकवर गाड्यांची गर्दी झाली. बॅनर काढण्यात आल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली, असंही मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.