
Validity of Recharge Plans: महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त असलेल्या कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी आहे. आतापर्यंत लोक खाजगी कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅनपासून दिलासा मिळवण्यासाठी बीएसएनएल (BSNL) ची मदत घेत होते, परंतु आता सरकारी कंपनीनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. बीएसएनएलने त्यांच्या दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे. बीएसएनएलने ज्या रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे त्यांची किंमत अनुक्रमे 1499 आणि 2399 रुपये आहे. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे.
आता 1499 आणि 2399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता पूर्वीपेक्षा कमी असेल. कंपनीने या योजनांची वैधता बदलली आहे परंतु त्यामध्ये उपलब्ध असलेले फायदे पूर्वीसारखेच राहतील. बीएसएनएलने ज्या रिचार्ज प्लॅनची वैधता बदलली आहे ते कंपनीचे दीर्घकालीन प्लॅन आहेत. हे प्लॅन कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. वैधता वाढल्यानंतर या योजना खूप पसंत केल्या जात होत्या. याचा फायदा बीएसएनएललाही झाला. कंपनीने कमी किमतीत दीर्घ वैधता देऊन अवघ्या काही महिन्यांत लाखो नवीन ग्राहक जोडले होते. (हेही वाचा -UPI Down: GPay, PhonePe, Paytm ची सेवा ठप्प; वापरकर्त्यांना व्यवहार करताना करावा लागतोय अडचणींचा सामना)
आता ग्राहकांना मिळेल इतक्या दिवसांसाठी वैधता -
टेलिकॉम रिपोर्ट्सनुसार, सरकारी कंपनीने 1499 आणि 2399 रुपयांच्या प्लॅनची वैधता बदलली आहे. आतापर्यंत कंपनी 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता देत होती, परंतु आता या प्लॅनमध्ये फक्त 336 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. आतापर्यंत 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 425 दिवसांची वैधता होती, परंतु आता ती फक्त 395 दिवसांची वैधता देईल. (हेही वाचा -BSNL चा 251 रूपयात 251GB चा धमाकेदार प्लॅन; विना व्यत्यय पाहू शकाल आयपीएल)
BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन -
दरम्यान, बीएसएनएलच्या 1499 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, आता या प्लॅनची वैधता 336 दिवसांची असेल. कंपनी आपल्या ग्राहकांना 336 दिवसांसाठी सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देते. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी संपूर्ण वैधतेसाठी फक्त 24 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जातात. ज्यांना कमी इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वात किफायतशीर आहे.
BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन -
तथापी, जर तुम्ही BSNL चा 2399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खरेदी केला तर तो आता 395 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह येईल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर बीएसएनएलचा हा प्लॅन त्यांच्या ग्राहकांना दररोज 2 जीबी पर्यंत डेटा देतो. जर तुम्ही खाजगी कंपन्यांच्या महागड्या प्लॅनमुळे त्रस्त असाल तर बीएसएनएलचे स्वस्त आणि परवडणारे प्लॅन तुम्हाला दिलासा देऊ शकतात.