
Snake In Toilet: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील अनेक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. अलीकडेच असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शौचालयात बसलेल्या एका व्यक्तीसमोर अचानक साप (Snake In Toilet) येतो. खरंतर, हा व्यक्ती शौचालयात बसला होता आणि अचानक एक साप शौचालयात शिरला. हे पाहून या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, हे विचार करण्यापलीकडचे आहे.
शौचालयात शिरला साप -
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य एका बाथरूममधील आहे, जिथे एक व्यक्ती शौचालयात बसली होती आणि अचानक शौचालयाच्या दाराखालून एक साप आत शिरला. सापाला पाहताच हा व्यक्ती घाबरून उड्या मारायला लागला आणि टॉयलेट सीटवर चढला. पण या भयानक क्षणी तो त्याच्या मोबाईल कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवायला विसरला नाही. व्हिडिओमध्ये, साप त्या माणसावर हल्ला करण्यासाठी फुसफुसतानाही दिसतो. काही वेळाळे साप कचऱ्याच्या डब्याजवळ जातो. त्यानंतर संधी मिळताच तो व्यक्ती शौचालयाचा दरवाजा उघडतो आणि तेथून पळ काढतो. (हेही वाचा - Child Plays With Dangerous Snake: Reel बनवण्यासाठी काहीही..! लहान मुलाचा सापासोबत खेळतानाचा व्हिडिओ पाहून नेटीझन्स संतापले (Watch Video))
शौचालयात अचानक आला साप, पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी या व्यक्तीच्या धाडसाचे आणि शहाणपणाचे कौतुक केले. त्याच वेळी, काही लोकांनी याला खूप भयानक अनुभव म्हटले. तर अनेकांनी या व्यक्तीची खिल्लीही उडवली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @bangmaxnappadol नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.