Mumbai vs Delhi: दिल्ली कॅपिटल्सने आपला पहिला सामना गमावला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीचा संघ 193 धावांवरच गारद झाला. या पराभवानंतर बीसीसीआयने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दिल्ली कॅपिटल्सला वेळेच्या मर्यादेत त्यांचे षटके पूर्ण करता आले नाहीत, त्यामुळे कर्णधाराला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने, त्यांना 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)