
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings, TATA IPL 2025 30th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 30 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौ भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चेन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.3 षटकात पाच गडी गमावून 186 धावा करत लक्ष्य गाठले.
Captain answers the call, CSK live to fight another day 👊
🔗 https://t.co/M0nMjzfjYq pic.twitter.com/gIxGDtbOYc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 14, 2025
कर्णधार ऋषभ पंतची सर्वाधिक 63 धावांची दमदार खेळी
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 166 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 63 धावांची दमदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 49 चेंडूत चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, मिचेल मार्शने 30 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून विप्रराज निगम आणि रवींद्र जडेजा आणि यांनी मथीशा पाथिराणा प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
हे देखील वाचा: MS Dhoni Milestone: एमएस धोनीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
धोनी-दुबेने फिरवला सामना
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने 19.1 षटकांत पाच विकेट गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जकडून स्फोटक शिवम दुबेने 43 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, त्याने 37 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकार मारले. शिवम दुबे व्यतिरिक्त, रचिन रवींद्रने 37 आणि एमएस धोनीने 26 धावांचे योगदान दिले. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्सकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.